आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच आता संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर आज पुन्हा एकदा घोटाळ्याचा आरोप केला.
किरीट सोमय्यांनी पवईतील पेरुबाग येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे 300 ते 400 कोटींचा घोटाळा केला आहे. त्याची ट्रकभरून कागदपत्रं माझ्याकडे आहेत, असा बाॅम्बस्फोट संजय राऊतांनी यावेळी केला.
हे ही वाचा : “…होय आम्ही भ्रष्टाचार केला”; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर
कालपासून किरीट सोमय्या यांच्याविरोधात लोकांनी माझ्याकडे एक एक प्रकरण आणायला सुरुवात केली आहे. आज सोमय्याविरुद्ध माझ्याकडे 211 प्रकरणं जमा झाली आहेत. सोमय्यानं वसुली करून जवळपास साडे सात हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊतांनी यावेळी केला. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावाने ही वसुली केल्याचं संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, सोमय्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावाने वसुली केलीच. तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या नावानेही वसुली केली आहे. अमित शहांच्या नावावरही सोमय्यानं पैसे गोळा केले. मी आता एक एक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार आहे, असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
रोहित शर्मा-सुर्यकुमार यादवची मॅचविनिंग खेळी, भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
ईडीवर बोलू नको, बिडी प्यायला लावतील; नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला
“…म्हणून नारायण राणेंनी भाजपासमोर लाचारी पत्कारली ”; शिवसेनेचा पलटवार