आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन, तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागून ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेस इंदुरमधून अटक करण्यात आली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
मागील दीड-दोन वर्षांपासून मला हा त्रास सुरू आहे. या पूर्वी देखील त्यांनी एक खोटी तक्रार माझ्याविरोधात केली होती, नंतर ती तक्रार परत वापस घेतली. ज्या काही गोष्टी मागील दीड-दोन वर्षांत झाल्या, ज्या काही मी सहन करत होतो. सगळ्या गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये ही तक्रार द्यावी लागली., असं धनंजय मुंडे म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : “राष्ट्रवादी पक्षाचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी हाती बांधलं घड्याळ”
दरम्यान, तक्रार देत असताना पोलिसांना माझ्याकडून जे काही पुरावे द्यायचे, त्या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत. आता यात जे काय करायचं ते पोलिसांना करायचं आहे. असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
गुणरत्न सदावर्तेंची गाढवाशी तुलना करत शिवसेनेचा हल्लाबोल, म्हणाले…
राज ठाकरेंचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेना, राष्ट्रवादीला टोला, म्हणाले…
धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बाॅबी डार्लिंग; मनसेचा टोला