Home पुणे “सामाजिक कार्यकर्ते, मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेचे संस्थापक डाॅ.अनिल अवचट यांचं निधन”

“सामाजिक कार्यकर्ते, मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेचे संस्थापक डाॅ.अनिल अवचट यांचं निधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते 78 वर्षांचे होते.

अनिल अवचट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर आधी येथील संचेती रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी 9.15 वाजता पत्रकार नगर येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

हे ही वाचा : नगरपंचायतीमधील पराभवानंतर गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचलं; म्हणाले, “ज्याच्यात दम आहे तो…”

दरम्यान, अनिल अवचट यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती.

महत्वाच्या घडामोडी –

ध्वजारोहणावेळी आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केला- अॅ़ड. जयश्री पाटील

 ‘…अशा पुड्या सोडण्याची जयंत पाटील यांना सवयच’; चंद्रकांत पाटलांचा टोला

“जळगावमध्ये गुलाबराव पाटील गिरीश महाजनांच्या घरी, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना उधाण”