…म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

0
466

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता.

नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण आहे. ते नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल, असा टोला फडणवीसांनी राऊतांना लगावला होता. यावरून आता संजय राऊतांनी पलटवार केला आहे. फडणवीस यांना सुबुद्धी न आल्याने त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, असा प्रतिटोला राऊतांनी यावेळी फडणवीसांना लगावला. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीची मोठी खेळी; एमआयएम, भाजपमधील ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”

जर तुम्हांला त्यावेळी सुबुद्धी आली असती की, शिवसेना हा आपला मित्र पक्ष आहे. शिवसेना हा आपला हिंदुत्ववादी पक्ष आहे. आपण त्या मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे ही सुबुद्धी आली असती तर, आज आपण कदाचित मुख्यमंत्री असता. पण तुम्हांला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय, असं जोरदार प्रत्युत्तर राऊतांनी यावेळी फडणवीसांना दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

रेणु शर्माला अटक झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“राष्ट्रवादी पक्षाचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी हाती बांधलं घड्याळ”

गुणरत्न सदावर्तेंची गाढवाशी तुलना करत शिवसेनेचा हल्लाबोल, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here