मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असा इशारा रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. यावरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचं आहे. त्यांना अधिवेशन काळामध्ये लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाहीयत म्हणून तुम्ही लोकांना लॉकडाऊनची धमकी देणार का?, इतके दिवस रुग्ण वाढले नाही. आताच बरे रुग्ण वाढले. आणि रुग्णवाढीचं काय कारण सांगितलं जात आहे तर ट्रेन पुन्हा चालू झाल्या. ट्रेनआधी पूर्णपणे बंद होत्या का? कशामुळे वाढले रुग्ण?, ही सरकारची नाटकं सुरु आहेत. ये पब्लिक हैं सब जानती है, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सावधान सध्या करोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो .टीप-ह्या नंतर अनेक मा वि आ समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे ते बोलणारच, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे
सावधान सध्या करोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो.टीप-ह्या नंतर अनेक मा वि आ समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे ते बोलणारच
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“धोका वाढला! साताऱ्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी”
“शिवसेना नेते अनंत तरे यांचं दीर्घ आजारानं निधन”
“जो पर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही”
आमच्या जिल्हयात ‘सामना’ येतचं नाही, त्यामुळे…; गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेला टोला