“…म्हणजे नारायण राणेंना कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल”

0
663

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर  केंद्रिय मंत्री नारायण राणे  यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. याला आता शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय.

नारळावरची कुस्ती जिंकून हिंद केसरीची बरोबरी नारायण राणे करु शकत नाहीत. नारायण राणे हे बत्ताशावरचे पैलवान आहेत. ते हिंद केसरीची बरोबरी करु शकत नाहीत, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

हे ही वाचा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

जिल्हा बँकेच्या निवडणुका या मर्यादित मतांच्या निवडणुका आहेत. जनमताचा कौल घ्यायला पुढे या म्हणजे तुम्हाला कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल, असा इशाराही शंभूराज देसाई यांनी राणेंना दिलाय.

महत्वाच्या घडामोडी – 

“मुख्यमंत्र्यांनी दिली मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट; महापालिका हद्दीतील 500 चाै. फुटापर्यंतच्या मालमत्ता कर केला रद्द”

मागील 7 वर्षात पंतप्रधान मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली; राष्ट्रवादीचा सवाल

गल्लीत क्रिकेट जिंकणारे म्हणत आहेत की, आम्ही वर्ल्डकप जिंकू; मलिकांचा राणेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here