मुंबई : कोरोनाच्या संकटकाळातही केंद्र सरकार प्रशासनाला हाताशी धरून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राजकारण करत आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील विरोधी पक्षाने याचा सर्वप्रथम विरोध केला पाहिजे. परंतु, त्यांना केंद्र सरकार ही कृती महाराष्ट्राचा अपमान वाटत नसेल तर विरोधकांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार उरणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे
भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या राज्यांमध्ये कोरोना पळालेला आहे. तर सरकार नसलेल्या राज्यांमध्ये कोरोना आहे, अशाप्रकारे केंद्र सरकार वागत आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाब ही राज्ये कोरोना हाताळणीत अपयशी ठरली असे केंद्र सरकारेच म्हणणे आहे. पण हे त्या राज्यांचे नव्हे तर मोदी सरकारचे अपयश आहे. कारण, ही राज्यं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करत होती, असंही संजय राऊत यांनी म्हटंल आहे.
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रात लोकशाही नसून ‘लॉकशाही’ आहे; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
“जयंत पाटलांनी पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी”
…तर संघर्ष अटळ आहे; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा
बेअरस्टो, पांडेचे झुंजार अर्धशतकी खेळी व्यर्थ ; कोलकाताचा हैदराबादवर 10 धावांनी विजय