नवी दिल्ली : लोकसभेत 127 व्या घटना दुरुस्तीबाबत चर्चा सुरु आहे. यावरुन खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. याला भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“सर्वजण फिरून फिरून मराठा आरक्षणावर येत आहेत. दुसरा कोणता विषय येथे मांडताना दिसत नाही. राज्यांना राज्याचा निर्णय घेण्याचा निर्णय का बहाल करण्यात आला?. 2018 नंतर केंद्राने सर्व अधिकार आपल्या ताब्यात ठेवले आहेत, अशी राज्यांना धास्ती होती. त्यानंतर केंद्राने राज्यांचे अधिकार राज्यांना देण्यासाठी पाऊल उचललं आहे, असं प्रितम मुंडे म्हणाल्या आहेत.
तुमच्या राज्याची सूची बनवण्याचे अधिकार तुम्हाला मिळालेले आहेत. या सूचीमध्ये आपण सर्व जाती समूहाचा विचार करतोय. मग वारंवार ही चर्चा मराठा आरक्षणावरच का येतंय? ज्या लोकांना मराठा आरक्षणाचा प्रचंड कळवळा येताना दिसतोय. आमचं सरकार राज्यात असताना सरकारने आपली भूमिका खंडपीठासमोर मांडली आणि हायकोर्टाने मराठा आरक्षण वैध आहे, असं ठरवलं. त्यावेळी कुणाला त्रास झाला नाही. आज जे विरोधात आहेत आणि भाजपाच्या त्या वेळच्या भूमिकेविषयी प्रश्न मांडताहेत.त्यावेळी त्यांनी कडाडून विरोध केला, असं माझ्या स्मरणात नाही, असंही प्रितम मुंडेंनी म्हटलं आहे.
केंद्र आणि राज्यातील त्यावेळच्या सरकारची भूमिका चांगली नाही. म्हणून एनडीएतून बाहेर पडले, असं कुणी मला आठवत नाही. त्यावेळेस आपला कळवला कुठे गेला होता.” अशी टीकाही प्रीतम मुंडे यांनी शिवसेनेवर केली.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री गेले दीड वर्ष मंत्रालयात न गेल्याने…; चित्रा वाघ भडकल्या
…मग हा टाइमपास कशाला? निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल
मंदिर बंद ठेवून, बार सुरू करणं हे या सरकारचं धोरणच; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
महाराष्ट्र लवकरच ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारं पहिलं राज्य ठरणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे