“मोदी-शाहांचे राजकारण असो किंवा कुटुंबातील गद्दारी, शरद पवार लढवय्याप्रमाणे लढत आहेत”

0
180

मुंबई : महाराष्ट्राला धक्का देणारी घटना काल एका रात्रीत घडली. सकाळी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर सुप्रिया सुळे यावर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

साहेब हरतील किंवा जिंकतील पण शरद पवार एक मराठा लढवय्याप्रमाणे या युध्दात लढत आहेत. मग मोदी-शाहांचे राजकारण असो किंवा कुटुंबातील गद्दारी, असं व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस टेवत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

पवार साहेबांनी वेळोवेळी सर्वांवर मात दिली आहे. अशी इच्छाशक्ती मी कधीच ऐकली नाही आणि पाहिलीही नाही, अस म्हणत मुलगी म्हणून त्यांना अभिमान आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, दरम्यान, अजित पवारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूंकप झाला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत फूट फडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावर सुप्रिया सुळे यांनी पक्ष आणि कुटुंबामध्ये फुट पडली असल्याचं व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस ठेवत पवार कुटुंबामध्ये फुट पडली असल्याचं स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here