मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेण्याच्या निर्णयाचं स्वागत करताना ब्रेबॉर्न स्टेडिअमदेखील ताब्यात घेतलं जावं अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे. त्यांच्या या मागणीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शवला होता. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
आईशप्पथ ह्यांना वेड लागलय. संज्या म्हणतो ग्राउंड ताब्यात घ्या त्याला प्रदूषण मंत्री आदित्य उत्तर देतो पाऊस येतोय बेड भिजतील. हे असले राज्यकर्ते आपले तर काय भलं होणार आपलं?, अशा शब्दात निलेश राणे यांनी टीका केली आहे.
आईशप्पथ ह्यांना वेड लागलय… संज्या म्हणतो ग्राउंड ताब्यात घ्या त्याला प्रदूषण मंत्री आदित्य उत्तर देतो पाऊस येतोय बेड भिजतील.. हे असले राज्यकर्ते आपले तर काय भलं होणार आपलं??? https://t.co/3FDGOtBM6J
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 17, 2020
दरम्यान, कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर केला पाहिजे. क्वारंटाइन सुविधेसाठी वानखेडे मैदान ताब्यात घेण्याचा निर्णय योग्य आहे. ब्रेबॉर्न स्टेडिअमदेखील ताब्यात का घेतलं जाऊ नये ? तिथेही योग्य सुविधा उपलब्ध आहेत, असं संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं होतं. यावर आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शवला होता.
महत्वाच्या घडामोडी-
उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; किरीट सोमय्यांच मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र
संजय राऊत यांच्या मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; म्हणाले…
एकनाथ खडसे यांना बाजूला सारण्याची हिम्मत राज्यातील भाजप नेत्यांमध्ये नाही- पृथ्वीराज चव्हाण
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्या मृत्यूवर मुंबई पोलिसांचं भावूक ट्विट