मुंबई : विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग प्रस्ताव आणि त्यावरील चर्चेला आक्षेप घेतला होता. अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी सभागृगहात गोंधळ घातला होता. त्यानंतर कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं होतं.
हक्कभंगाचा प्रस्तावावर संताप व्यक्त करत चर्चा करायची नसेल तर आम्ही घरी जातो. कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांवर चर्चा होत नसेल, पूरग्रस्तांवर चर्चा होत नसेल, तर आम्ही येथे कशाला बसायचं,” असं म्हणत फडणवीस म्हणाले.
जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आम्हाला सभागृहात बोलावलं. तसंच ३ वाजता चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. शिवसेनेचे आमदार एकामागून एक विषय काढत आहेत. मग आता चर्चा ५ वाजता करा. करोना, शेतकऱ्यांचे असे महत्त्वाचे विषय असताना असं कसं चालेल? त्यामुळे ३ वाजल्यानंतर चर्चा केली पाहिजे. आता आपण ही चर्चा केली तर ३ वाजता मंत्र्यांच्या उत्तरासह ही चर्चा संपवावी लागणार आहे, असंही फडणवीस म्हणाले
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर, संजय राऊत मुख्य प्रवक्ते; तसेच ‘या’ 10 जणांना स्थान
आम्ही विचार केला त्यापेक्षा ते जास्त नॉटी आहेत; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
…तर एकाही अधिकाऱ्याला गाडीत फिरू देणार नाही; रूपाली पाटील ठोंबरेंचा पालिकेला इशारा
महिलांचा आदर करण्याची शिवसेनेला शिकवण- संजय राऊत