…तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू; संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं

0
1100

मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली. यानंतर धनंजय मुंडे व नवाब मलिक यांना राजीनामा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. यावर आरोप करणाऱ्या विरोधकांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांनी कितीही आरोप करु देत, तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की, हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही, असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला. संजय राऊत हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

दरम्यान, विरोधक उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झालं तरी राजीनामा घ्या असं ते म्हणतात. असं जर म्हणायला गेलो तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत जे आंदोलन सुरु आहे ते राजीनामा मागण्यासारखंच आहे. आरोप करु देत त्याच्याने काही साध्य होत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here