मुंबई : मुख्यमंत्र्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामाची आणि आरोग्यविषयक उपाययोजनांची माहिती दिली. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री म्हणतात आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार. आमच्या कोकणी भाषेत “म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?” मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या अशा मागण्या करीत होतात ते काय होते? फसवणूक? आता बोलून नाही करुन दाखवा, असं म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगवला आहे.
दरम्यान, राजकारण करु नका हे नेमकं कुणाला सांगताय?, संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना? ते खाजगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का?, असा सवालही आशिष शेलार यांनी यावेळा केला.
मुख्यमंत्री म्हणतात..आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार..!
आमच्या कोकणी भाषेत “म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार ?”मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या अशा मागण्या करीत होतात ते काय होते? फसवणूक?
आता बोलून नाही, करुन दाखवा! 1/4
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 24, 2020
महत्वाच्या घडामोडी –
केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती काय आलं?; उद्धव ठाकरेंचा सवाल
मुख्यमंत्र्यांचं कोरोनायोद्ध्यांना भावूक पत्र; म्हणाले…
मी लुक्क्याना धमकी देत नाही; निलेश राणेंचा रोहित पवारांवर पलटवार
ट्रेंडिंग घडामोडी –
राजकारण करु नका हे नेमकं सांगताय कुणाला?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्याना खोचक टोलाhttps://t.co/SWB7Dq6UXP@ShelarAshish @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @ShivSena
— घडामोडी (@ghadamodi1) May 24, 2020