आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
देशातील सर्वात प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. मात्र प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्या नंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
पिंपरीत राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; महापालिकेतील ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
बदामाचा खुराक चालू करा म्हणजे…; रुपाली चाकणकरांचा टोला
‘सरकारने आता तरी जागं व्हावं’, मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप