आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 50 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं महाविकास आ? घाडी सरकार अडचणीत आलं आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या सर्व बंडामागील खुलासा केला आहे.
“मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल”,असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : मोठी बातमी; देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांची वडोदऱ्यात भेट झाल्याची चर्चा
दरम्यान, आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर….
तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…#MiShivsainik @rautsanjay61— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का; शिक्षणमंत्री उदय सामंतही शिंदे गटात सामील”
शिवसेनेतील बंडखोरीवर, ओवेसींची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…
शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊत यांचा दावा