Home महाराष्ट्र “…त्यामुळे पंकजा मुंडेंच्या डोळ्यात अश्रू आले; त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजे”

“…त्यामुळे पंकजा मुंडेंच्या डोळ्यात अश्रू आले; त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजे”

औरंगाबाद : पंकजा मुंडे यांची ओबीसी म्हणून पक्षात उपेक्षा झालीय. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

सत्तेत असूनही विरोधकांसारखे वागले तर जनतेची कामे होतात. भावाभावांमध्ये भांडण लावून सरंजमदारी टिकवण्याचे काम आजवर केले गेले. सत्यनारायणाची पूजा आम्ही केली पाहिजे. बदाम आणि खारखा आमच्याच पोरांनी खाल्ली पाहिजे. पण दोघांच्या भांडणात सर्वाधिक लाभ ठाणेदाराचा होतो, हे लक्षात घ्या, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दरम्यान, औरंगाबाद येथे ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला संबोधित करताना विजय वडेट्टीवार बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

आमच्या नेत्यांवर बोलाल तर…; नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा

2024 ला आमचं एकच इंजिन असणार; युतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान

सुवर्ण पदक पटकावलंच! टोक्योमध्ये नीरज चोप्रानं घडवला इतिहास

पती मारहाण करतो, सासरे फिरवतात स्तनां’वर हात; यो यो हनी सिंगच्या पत्नीचा खळबळजनक आरोप