मुंबई : “आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्याला ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार साहेबांची बदनामी करण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकरांना विधानपरिषदेची आमदारकी देऊन केलेली एक चाल आहे. त्यामुळे पडळकरांकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, त्यांची विचारसरणीच वाईट आहे,”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
पवारसाहेब मुख्यमंत्री नाहीत आणि पंतप्रधानही नाहीत, त्यांच्यामुळे आरक्षण गेलं असं मूर्खपणाचं वक्तव्य भाजपचे लोक करत आहेत. शरद पवारांबद्दल बोलून स्वतःचं हस करून घेत आहेत, असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच- चंद्रकांत पाटील
“गोपीनाथ मुंडे आज असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं”
शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही- गोपीचंद पडळकर
‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत झाली आहे- गोपीचंद पडळकर