मुंबई : निवडणूक प्रचारात ‘मी पुन्हा येईन’च्या घोषणा दिल्या गेल्या. मात्र हा चेष्टेचा विषय झाला कारण कोणत्याही नेत्याने, राज्यकर्त्याने जनतेला गृहित धरायचं नसतं. असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला, हा प्रयोग एक अपघात होता असं मला मुळीच वाटत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वी महाराष्ट्रात जे सरकार होतं त्या सरकारमध्ये शिवसेनेला कायम बाजूला ठेवलं गेलं. लोकांनी त्या पाच वर्षांच्या काळात भाजपाचं सरकार काय असतं तेच अनुभवलं, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ही मुलाखत तीन भागांमध्ये होणार असून आज या मुलाखतीचा पहिला भाग पार पडला.
महत्वाच्या घडामोडी-
“मुख्यमंत्र्यांचं ‘हे’ काम पाहून देवेंद्र फडणवीसांचे डोळे पांढरे होतील”
मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी- अशोक चव्हाण
एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद; नारायण राणेंचा शिवसेनेला टोला
प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर; मुख्यमंत्र्यांसोबत ‘या’ 3 मुद्द्यांवर चर्चा