मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनावर लस तयार करण्याचं काम ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरु आहे. ही लस यशस्वी झाली तर जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. भारतामध्ये या लशीचं उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये केलं जाणार आहे.
सीरम इन्स्टिट्युटकडून लस बनवण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक राजीव ढेरे यांनी दिली आहे. सुरुवातीला कोणतीही लस बल्कमध् बनवली जाते. त्याप्रमाणे ही लस देखील बल्कमध्ये बनून तयार आहे. आणखी काही प्रक्रिया झाल्या की ही लस बाटल्यांमधे भरणे सुरु करणार आहोत, असं राजीव ढेरे यांनी म्हटलं आहे.
या लसीच्या भारतीय लोकांवरही चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होईल. 1500 भारतीय लोकांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत, असं राजीव ढेरे यांनी सांगितलं.
दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांकडून सुरु असलेले प्रयोग, भारतातील पंधराशे लोकांवर सुरू असलेल्या चाचण्या आणि कायदेशीर सोपस्कार नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होतील. त्यामुळे डिसेंबर महिन्यात किंवा थोड्या पुढच्या काही दिवसांमध्ये ही लस लोकांना उपलब्ध होऊ शकते, असा दावा राजीव ढेरे यांनी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
आता तरी जागे व्हा, मोठ्या प्रमाणात चाचण्यांना पर्याय नाहीच; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा
करोना चाचण्या कमी केल्यानं आपण काय कमावलं काय गमावलं? फडणवीसांनी दिलं उत्तर