आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
कदाचित मुख्यमंत्र्यांना रिअलाईज झाले असेल की, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज मनातली भावना बोलून दाखवली., असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. आम्ही सक्षम विरोधीपक्ष आहोत. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत, असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
युतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भाजपला खुली ऑफर; म्हणाले…
राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का; पक्षाचा आदेश न मानणाऱ्यांचे पद रद्द
भाजपच्या माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; किरीट सोमय्याची प्रतिक्रिया, म्हणाले…