Home महाराष्ट्र ‘…म्हणून शिवसेनेने सावरकरांचा फोटो लावला नाही’; भाजपचा शिवसेनेवर घणाघात

‘…म्हणून शिवसेनेने सावरकरांचा फोटो लावला नाही’; भाजपचा शिवसेनेवर घणाघात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : प्रजासत्ताक दिनी शिवसेना नेत्यांकडून सर्व क्रांतिकारकांचे फोटो लावण्यात आले. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो लावला गेला नाही. या मुद्यावरुन शिवसेना भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

कल्याण डोंबिवली महापलिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर होताच भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण यांनी वीर सावरकरांचा फोटो या मुद्यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे.

हे ही वाचा : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक; महापालिका निवडणुकीची रणनिती ठरणार

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे शहर प्रमुख आणि स्थानिक नेत्यांकडून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी सर्व क्रांतिकारकांचे फोटो लावले होते. मात्र वीर सावरकारांचा फोटो लावला गेला नाही. एका प्रभागाचे नाव वीर सावरकर रोड होते. तेही बदलण्यात आले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना खूष करण्यासाठी अत्यंत घृणास्पद प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे. हे आम्ही अजिबात होऊ देणार नाही, असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  आमदारांकडून काही काम झाले नाही. फक्त जातीपातीचे राजकारण केले जात आहे. चव्हाण यांचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. वीर सावरकरांचा फोटो लावण्यात आला होता, असा पलटवार शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“आगामी महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार-आदित्य ठाकरे पुणे दाैऱ्यावर, युती होणार?”

राज्यपालांनी 12 आमदारांचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचा नागरी सत्कार करू- संजय राऊत

“भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल”