…त्यामुळे शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

0
417

अहमदनगर : जेजुरी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुण्यश्लोक पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शरद पवारांनी अहिल्याबाईंचा जन्म राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये झाला आहे, असं वक्तव्य केलं होतं. यावर भाजप नेते राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले ते अनावधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असं म्हणत राम शिंदे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

दरम्यान, अहिल्यादेवी होळकर यांचा असा नामोल्लेख करणं ही गंभीर चूक असून हा अवमान आहे, असं म्हणत राम शिंदे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी 

“सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ, त्यांना फस्ट्रेशन आलंय”

शिवसेना हिंदुत्वापासून दुरावली आहे; अमित ठाकरेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

‘ये नैना डरे डरे’! अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज; पहा व्हिडिओ

“जळगाव हादरलं! ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यु”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here