आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी 25 वर्ष युतीत सडलो, अशी टीका केली होती. त्या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. यानंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचं राजकारण केलं मात्र आता त्यांना शिवसेना काय आहे हे समजू लागल्याने अशाप्रकारची विधाने ते करत आहेत. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचं वादळ; अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ
पाच वर्षाचा निकाल पाहिला तर भाजपामुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. उध्दव ठाकरे यांनी 25 वर्ष युतीत सडलो असे विधान केले आहे. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता जे नगरपालिकांचे निकाल आले त्यावरुन भाजपासोबत राहिल्याने कमकुवत झालेल्या शिवसेनेचा ग्राफ कितीतरी पटीने वाढलेला दिसला, असं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.
“बाळासाहेबांनी युतीचा निर्णय घेतला होता शिवाय जिवंत असताना युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. आम्ही काँग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे हा प्रस्ताव होता पण काही कारणामुळे जमले नाही. 2019 च्या आधीपासून भाजपासोबत खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजपा ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळले होते. त्यामुळे सेनेने भूमिका घेऊन भाजपाला बाजूला केले,” असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
अखेर मुंबई महापालिकेसाठी मनसे-भाजप एकत्र?; युती होणार?; चर्चांना उधाण
उद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; आता प्रवीण दरेकर, म्हणतात…
‘…तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी झालीच नसती’; सुधीर मुनगंटीवारांची टीका