Home महाराष्ट्र …म्हणून प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवण्यात आलं; किरीट सोमय्याचं ठाकरे सरकरावर टिकास्त्र

…म्हणून प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवण्यात आलं; किरीट सोमय्याचं ठाकरे सरकरावर टिकास्त्र

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांची बदली करण्याच्या निर्णय घेण्यात आला. यावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

ठाकरे सरकारमुळो मुंबई कोरोनाची राजधानी झाली आहे. आणि आता प्रविण परदेशी यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पालकमंत्री असताना त्यांच्याच मतदारसंघ असलेल्या वरळीत सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. दुसरा क्रमांक धारावीचा आहे. तिथंही एक कॅबिनेट मंत्री आहेत. ते सर्व आरोप केवळ प्रशासनावर करत आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, मागील 23 वर्षे मुंबई महानगरपालिकेत ठाकरे परिवाराचं राज्य आहे. आता ठाकरे परिवारातील व्यक्ती मुख्यमंत्री देखील आहे. ठाकरे परिवारीतील एक व्यक्ती मुंबईचे पालकमंत्री आहेत. मागील 50 दिवस कोरोनाची लढाई सुरु आहे. मग ती ही लढाई केवळ प्रशासन चालवत होतं का? जर असं असेल तर मग राजकीय नेतृत्त्व काय करत होतं? मुख्यमंत्री घरातून बाहेर पडू शकत नाही. त्यांची तेवढीही हिंमत नाही का? असा सावालही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…म्हणून अंत्यविधीला 20 जणांना तर दारुच्या दुकानासमोर हजारोंना परवानगी- संजय राऊत

कोणत्याही लसीशिवाया निघून करोना व्हायरस; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

“औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले मजूर कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी”

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; घेतली राज्यपालांची भेट