मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केल्यानंतर बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे, असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री मुंबई मागत असतील तर कर्नाटकची राजधानी बंगळुरूवर आमचा जास्त हक्क आहे, असं म्हणत जयंत पाटलांनी लक्ष्मण सवदींच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो राज्यविस्तार केला तो अगदी दिल्लीपर्यंत केला, जर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री मुंबई मागत असतील तर कर्नाटकची राजधानी बंगळुरूवर आपला अधिकार स्वाभाविक आहे. कर्नाटकचा संबंध मुंबईशी कधी आला नाही, मात्र मराठी माणसाचा संबंध दिल्लीपर्यंत आहे, मग आपला कर्नाटकावर जास्त हक्क आहे, तेव्हा अशा प्रकारचे वायफळ बोलू नये, असा सल्ला जयंत पाटलांनी यावेळी लक्ष्मण सवदींना दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही- चंद्रकांत पाटील
“PF संदर्भात निर्मला सीतारमण यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा”
‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन
कोरोना लसीकरणासाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा!