मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकसत्ता डाॅट काॅमला मुलाखत दिली. त्यात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
मला असं वाटतंय की, या सरकारमध्ये अजिबात ताळमेळ नाही. उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, त्यांना मुख्यमंत्री बननण्याची संधी मिळाली. चांगली गोष्ट आहे. एकत्र न येणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन बनवलेलं सरकार आहे. त्यामुळे या तिघांमध्ये अजिबात ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार कधी पडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे ‘महाविकास आघाडी सरकार गो’ हीच माझी घोषणा आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांविषयी मला आदर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणातही आहेत. आता ते म्हणत आहेत की, कोणीही मायचा लाल सरकार पाडू शकत नाही. त्यावर मी असंच म्हणेन की, कोण आहे तो मायचा लाल, मला तर दिसतेय ही अजितदादांची चाल. त्यामुळे एक दिवस अजित पवार हेच सरकार पाडतील.
महत्वाच्या घडामोडी –
“पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ ‘भाजपशी’ हे सरकारनं लक्षात ठेवावं”
संजय राऊतांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू; नाना पटोलेंचा टोला
अखेर कोरोना लसीचा पहिला डोस घेतला; अमृता फडणवीसांनी फोटो शेअर करत दिली माहिती
“वाघ हा वाघच असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर फक्त वाघाचं राज्य”