आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : वर्धा जिल्ह्यात कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या 11 कवट्या आणि 52 हाडं आढळल्याने एकच खळबळ उडाली. यावरून आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झालाय, असं म्हणत 30-30 हजारात चिमुकल्या जीवांशी खेळण्याची सौदेबाजी चालली आहे. कायदे कमजोर नाहीत. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलाय, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा : अजित पवारांच्या शब्दाला मंत्रीमंडळात किंमत आहे की नाही?; भाजपचा सवाल
दरम्यान, राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, असा इशाराही चित्रा वाघ यांनी यावेळी राज्य सरकारला दिला आहे.
राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे; आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झालाय…
३०-३० हजारात सौदेबाजी चाललीय चिमुकल्या जीवांशी खेळण्याची..
कायदे कमजोर नाहीत
कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलायराज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड.. pic.twitter.com/W8RTt11Ew0
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 13, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“…तर मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढेन”
“मोठी बातमी! मनसे आमदार राजू पाटील यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण”
“गायब असलेले नितेश राणे अखेर दिसले कॅमेऱ्यात; राणेंना पाहण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी”