मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा फॉर्ममध्ये धर्माच्या रकान्यातून हिंदू शब्द वगळून अल्पसंख्याकेत्तर असा उल्लेख केला, यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
राज्य सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षा अर्जांमधून हिंदू शब्द वगळला. त्यामुळे आता ठाकरे सरकारला हिंदू शब्दाचेही वावडे वाटू लागले आहे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
मंदिरे सुरु करण्यासाठी तब्बल सहा महिने उशीर करणे, आषाढी वारीसाठी दिलेल्या बससाठी भाडे आकारणे, हिंदूंच्या साधूंचे हत्याकांड होऊनही आरोपींच्या विरोधात कडक कारवाई न करने आणि आता चक्क हिंदू शब्दच वगळणे यातून ठाकरे सरकार ‘काहींना’ खुश करण्यासाठी आणि आपली मतपेटी सांभाळण्यासाठी सतत हिंदू विरोधी निर्णय घेत आहे, असा आरोपही अतुल भातखळकर यांनी यावेळी केला.
दरम्यान, 24 तासांत हा फॉर्म मागे घेऊन त्यात हिंदू धर्माचा उल्लेख न केल्यास भाजपकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अतुल भातखळकर यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी-
बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- रामदास आठवले
“बॉलिवूडवाले मुंबईसारखी स्वप्ननगरी सोडून यूपीत जाऊन काय डाकू बनणार का?”
बॉलिवूड मुंबईबाहेर नेणं हे खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का?- योगी आदित्यनाथ
“तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय”