Home महाराष्ट्र “…तर आता शिवसेनेचं शुद्धीकरण करावं लागेल”

“…तर आता शिवसेनेचं शुद्धीकरण करावं लागेल”

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाले. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

अशुद्ध आणि शुद्ध असा भेदभाव करणारी मनस्थिती प्रबोधनकार ठाकरेंना मानणाऱ्या पक्षाची झाली आहे. ही विदारक स्थिती महाराष्ट्राच्या संस्कृतीची झाली आहे. ती जागा कोण्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नाही. ती जागा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारातील आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर जाण्यास कोणालाही मनाई नाही. शुद्धीकरण करायचं असेल तर आता शिवसेनेचं करावं लागेल, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

विश्वासघाताने सोनिया गांधींसोबत सत्तेत जायचं आणि सोनिया गांधींची शपथ आदित्य ठाकरे यांनी घ्यायची. याचं शुद्धीकरण बाळासाहेबांच्या नावाने करावं लागेल. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना तुरुंगात पाठवले. सत्तेसाठी त्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. स्वत:च्या वडिलांच्या विचारांना आणि प्रेरणेला तिलांजली देऊन हे सगळे केले आहे. या शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आता आली आहे. शुद्धीकरणाच्या नावाने नौटंकी करू नये, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“नारायण राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला शिवसैनिकांकडून शुद्धीकरण”

आमदार गोपीचंद पडळकरांना अटक करून दाखवाच, मग आम्ही दाखवू की…; सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा

‘आधी केलेले पाप धुवा, मगच आशीर्वाद मागा’; जन आशीर्वाद यात्रेवरुन राष्ट्रवादीची टीका

‘भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल’; मुख्यमंत्र्यांवरील टीकेला अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर