मुंबई : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झालेत की नाही? या मुद्द्यावरून देशाच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केंद्र सरकारने सोमवारी संसदेमध्ये ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही, असं जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर त्याला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मे महिन्यात ठाकरे सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं होतं की राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही. केंद्राचे अहवाल राज्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच बनतात. केंद्राने ठाकरे सरकारच्या माहितीच्या आधारे तसाच अहवाल बनवला. या अहवालाचा म्हणे संजय राऊत यांना धक्का बसला”, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
अहो संजय राऊत निर्लज्जपणालाही मर्यादा असतात. ठाकरे सरकारने न्यायालयात केलेले खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवत जा. मग असे धक्के बसणार नाही. राऊत आता लोकांना केंद्र सरकारविरुद्ध केस दाखल करायला सांगतायत. मग आता तोच न्याय स्वतःलाही लावा, असंही अतुल भातखळकरांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावला नसल्याची केंद्राची माहिती ऐकून आपल्याला धक्का बसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
अहो @rautsanjay61 निर्लज्जपणालाही मर्यादा असतात. ठाकरे सरकारने न्यायालयात केलेले खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवत जा. मग असे धक्के बसणार नाही. राऊत आता लोकांना केंद्र सरकारविरुद्ध केस दाखल करायला सांगतायत. मग आता तोच न्याय स्वतःलाही लावा.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?; चित्रा वाघ यांचा सवाल
“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल”
फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले; नाना पटोलेंचा मोठा आरोप
…म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना नेता मानत नाही- पंकजा मुंडे