Home महाराष्ट्र …तर आता मी देखील करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

…तर आता मी देखील करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी, ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली असून यासंबंधी पत्रही दिलं आहे. राजू शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यावर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीला जाहीर इशारा दिला.

लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा झालेला एक समझौता होता. तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झालं तरी मला आमदार करा नाहीतर जीव सोडणार असं माझं म्हणणं नाही आहे.

दरम्यान, गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. म्हणून काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असं राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटलं. तसेच करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करेन असा इशाराही

महत्वाच्या घडामोडी –

पंकजाताई, 2024 च्या निवडणुकीत मी तुमच्यासोबत- करूणा मुंडे

चोराच्या उलट्या बोंबा अशी विरोधी पक्षनेत्यांची स्थिती- नाना पटोले

राजकारणातील मुठभर लोक जनतेचा पैसा पोरींवर उडवत आहेत; करूणा मुंडेंचा धक्कादायक आरोप

अनिल देशमुखांना फरारी घोषित करा, त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्या यांची मागणी