Home महाराष्ट्र …तर एकाही अधिकाऱ्याला गाडीत फिरू देणार नाही; रूपाली पाटील ठोंबरेंचा पालिकेला इशारा

…तर एकाही अधिकाऱ्याला गाडीत फिरू देणार नाही; रूपाली पाटील ठोंबरेंचा पालिकेला इशारा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णांना रूग्णवाहिका वेळेत न उपलब्ध झाल्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर मनसेच्या महिलाध्यक्षा रूपाली पाटील ठोंबरे यांनी महापालिकेवर निशाणा साधला आहे.

रुग्णांना रुग्णवाहिका मिळेना आणि तुम्ही अधिकारी कसे गाडीत फिरता?, मनसे नगरसेवक वसंत तात्या मोरेंनी पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली. त्यामुळे आता नियोजन न केल्यास एकाही अधिकाऱ्याला गाडीत फिरू देणार नाही पालिकेला इशारा, असं रूपाली पाटील ठाेंबरे यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

लोकप्रतिनिधी असून न्याय देऊ शकत नसेल तर आम्ही नालायक असू, आम्ही माणूस आहोत कोरोना भयानक परिस्थितीत माणसांना जगवा. उपाय योजना द्या रे बाबांनो हात जोडून खूप वेळा सांगितलं, असंही रूपाली पाटील यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या पोस्टमध्ये वसंत तात्या मोरे यांनी एक महापालिकेची गाडी फोडल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महिलांचा आदर करण्याची शिवसेनेला शिकवण- संजय राऊत

धमकीचे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, याची चाैकशी झाली पाहिजे- देवेंद्र फडणवीस

मला महाराष्ट्र आवडतो; कंगणा रणाैतचं मराठीतून ट्विट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर आता शरद पवार आणि गृहमंत्र्यांना धमकीचे फोन