कणकवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा यशस्वी पार पडल्याने व त्यांनी कोकणाला भरभरून दिल्यानेच नारायण राणेंचा जळफळाट होत आहे, असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधाला आहे. ते कणकवली येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते.
राणेंकडून विकासकामांमध्ये अडचणी निर्माण करण्याचे काम होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सिंधुदुर्गमधील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत, असं राऊत म्हणाले.
कोणकणातील अनेक छोटेमोठे प्रकल्प देखील राणेंच्या काळातच रखडले आहेत. तर सी-वर्ल्डसह चिपी विमानतळ हे प्रकल्प रखडण्यास नारायण राणेच जबाबदार आहेत, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणांपलीकडे कोकणाला काहीही दिले नाही, असं राणे म्हणाले होते. यावर राणेंच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे येथील विकास रखडला असल्याचा आरो राऊत यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी-
“अजितदादा इतके वर्ष आपण उगाच दूर होतो”
शरद पवारांनी दिला पक्षातील मंत्र्यांना ‘हा’ मोलाचा सल्ला
इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा, नाव बदलायचं की विकास करायचा; इम्तियाज जलील
“मासिक पाळी नाही हे सिद्ध करण्यासाठी विद्यार्थींनीची तपासणी करणं दुदैवी”