…तर नाना पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात; देवेंद्र फडणवीसांचा टोला

0
347

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : सध्या राज्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग कुठे आहेत? याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू असतानाच काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना, परमबीर सिंग यांना परदेशात जाण्यासाठी केंद्राने तर मदत केली नाही ना? असा आरोप केला होता. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले काहीही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला उत्तर द्यायची गरज नाही. ते तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात, असा उपरोधक टोला देवेंद्र फडणवीसांनी यावेळी लगावला. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, फडणवीसांनी यावेळी बोलताना, मराठवाड्यातील पूरस्थितीवरही भाष्य केलं. आम्ही उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहोत. शेतकऱ्यांची परिस्थिती सरकारपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

गुलाब चक्रीवादळामुळं समजलं, गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे; मनसेचा पलटवार

“पंकजा मुंडे म्हणाल्या, जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, धनंजय मुंडे म्हणतात, तुम्ही तर…”

“काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी दिली असेल”

ऋतुराज-डू प्लेसिसची शानदार खेळी; हैदाराबादवर 6 विकेट्सनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवलं स्थान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here