आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिर्डी : महाविकास आघाडी मधील 50 ते 60 आमदार सरकारवर नाराज आहेत. मुख्यमंत्री भेटत नसल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढली आहे, असा दावा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते आज साई दरबारी आले होते. साई बाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला.
हे ही वाचा : “12 निलंबित आमदारांवरून अजित पवारांचा भाजपला टोला, म्हणाले… कारवाई करा, पण…”
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यसरकारला कायदा आणण्याची गरज का पडली..? गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही..? असा सवाल करत जवळपास 50 ते 60 सत्ताधारी आमदार सरकारवर नाराज आहेत. 16 महिने मुख्यमंत्री भेटत नसतील… त्यांची कामे होत नसतील तर काय होणार? असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या सरकारमध्ये खरच धमक असेल तर गुप्त मतदान घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, असं आव्हानही बावनकुळे यांनी यावेळी सरकारला दिलं.
महत्वाच्या घडामोडी –
“कट्टर शिवसैनिक सुमंत रूईकरच्या कुटूंबाला शिवसेनेतर्फे 5 लाखांची मदत, तसेच कुटूंबाची घेतली जबाबदारी”
“वडिलांच्या खांद्यावर बसूनही निलेश राणेंची अजित पवारांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही”
“राणे साहेब तुमच्या मुलांना आवरा, अन्यथा तुमच्यासारखाच त्यांचाही राजकीय अंत होईल”