आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : कल्याणजवळ असलेल्या मोहने परिसरात मंदिराच्या बांधकामावर कारवाई केल्याच्या संतापातून माजी नगरसेवकाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. आता या प्रकरणात मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेचे एकमेव आमदार असणाऱ्या राजू पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला पाठिंबा दिला आहे.
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी मंदिराच्या बांधकामाला बेकायदेशीर ठरवीत कारवाई केली. या कारवाई विरेाधात स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी प्रभाग कार्यालयात पोहचून सहाय्यक आयुक्त सावंत यांच्या कानशीलात लगावली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मुकंद कोट यांच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे स्थिर सरकार देण्यात यशस्वी; शरद पवारांचा दावा
या घटनेनंतर राजकारण तापले असताना मनसे आमदार राजू पाटील हे घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी कारवाई करण्यात आलेल्या मंदिरात पोहचले. गावकऱ्यांशी त्यांनी या विषयावर चर्चा केली. हे अधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ हे हिंदूत्व विसरले आहेत. हिंदू ह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित् गावातील मंदिरावर कारवाई करण्यात आली. इतर ठिकाणी बिनदिक्कत अनधिकृत बांधकामे सुरु आहे. ते अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना दिसत नाही. ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केली आहे. त्या अधिकाऱ्याने संपूर्ण गावाची आणि समाजाची माफी मागावी. नंतर आम्ही त्यांना कुठे बेकायदा बांधकाम सुरु आहे हे दाखवू, असं राजू पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अनधिकृत बांधकामे सोडून मंदिरावर कारवाई करणार तर उद्रेक होणारच असा इशारा राजू पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सर्वसामान्य जनतेची ताकद आज देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; सरपंचासह यवतमाळमधील हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”
“पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचेच वर्चस्व; पाचही सभापती बिनविरोध”