“…तर त्यांचे हातपाय तोडू, हा महाराष्ट्र आहे, इथं फक्त राज ठाकरेंचं राज चालतं”

0
632

मुंबई : चित्रपटात काम देण्याच्या आमिषानं मुलींकडे शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्या डायरेक्टरला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलंच फैलावर घेतलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील जोरदार व्हायरल झाला. यानंतर महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्ह येत याची माहिती दिली आहे.

बिरालाल यादव, राहुल यादव, कंचन यादव, जयजेश यादव या चौघांनी संबंधित महिलेला बोलवलं होतं. कास्टिंग डायरेक्टर महिलेला फार्महाऊसवर घेऊन आला. त्यानंतर महिलेने संपर्क केल्यानंतर मनसेनं त्यांना ट्रॅप केलं. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पाठलाग करत चौघांना जोरदार चोप दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी या चौघांना पोलिसांच्या हवाली केलं.

दरम्यान, मुलींसोबत जर कुणी असं करत असेल तर त्यांचे हात-पाय तोडणार आणि तुमच्या प्रदेशात पाठवणार. ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. इकडे राज ठाकरेंचं राज चालतं. सगळ्या भगिनींना आवाहन आहे की, जर कुणी असा प्रयत्न केला तर आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत, असं अमेय खोपकर यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल; शिरोळ, नृसिंहवाडीत पूरस्थितीची केली पाहणी

“बाळासाहेबांचा ढाण्या वाघ आहे तो, मुख्यमंत्री आमच्या मागण्या नक्की पूर्ण करतील”

“मोदींच्या सूचनेमुळे नितीन गडकरींनी घेतली शरद पवार यांची भेट; गुप्त भेटीमुळे चर्चांना उधाण”

…अन्यथा मनसे स्टाईलने रेल भरो आंदोलन करावं लागेल; मनसेचा राज्य सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here