…तर मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर सोडून द्या; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

0
194

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस  यांनी मुंबई पोलिसांवर नाव न घेता टीका केली. या टीकेवर  युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय.

मॅडम तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरवसा नसेल तर!, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

राजेश टोपेंच्या कर्तव्यनिष्ठेपुढे मला आधी लगीन कोंढाण्याचं म्हणणाऱ्या तानाजीची आठवण येते- रोहित पवार

… तर तुला लोक रस्त्यावरती तुडवतील; निलेश राणेंची संजय राऊतांवर आक्षेपार्ह टीका

दूध उत्पादकांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही- जयंत पाटील

अमित शहांना कोरोनाची लागण, उद्धव ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here