पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात दारु विक्री घातक आहे. त्यामुळे महसूल सोडा, आणि सामाजिक अंगाने विचार करा, असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
राज्यातील अनेक भागात दारूच्या दुकानांबाहेर, मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे अजिबात पालन केलं जात नाही. त्यामुळे दारु विक्रीतून मिळणारे उत्पन्न वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन सामाजिक अडचणी लक्षात घ्या, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला .
दरम्यान, दारु ही जीवनावश्यक गोष्ट नाही. त्यामुळे मुंबई, पुणे करोनाचे हॉटस्पॉट असताना या ठिकाणी व संपूर्ण महाराष्ट्रात दारुची दुकाने उघडी ठेऊ नये, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…”; राज्य सरकारचं आवाहन
“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत”
मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखविण्यात काँग्रेस कमी पडली- पृथ्वीराज चव्हण
दारू विक्रीच्या परवानगीवरुन आशिष शेलार यांचा राज्य सरकारला सल्ला; म्हणाले…