मुंबई : बाकीची राज्ये प्रगती न करता तिकडचे लोकं उठून इथे येत असतील तर महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्रावर संकटं घेऊन आली असं म्हणावं लागेल, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महराष्ट्रामध्ये अधिक प्रगती झाल्याने परराज्यातील लोकं महाराष्ट्रामध्ये येऊ लागल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, असं राज यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त राज यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
दरम्यन, उत्तर प्रदेशचे उदाहरण देत ज्या राज्यामध्ये आतापर्यंतच्या पाचहून अधिक पंतप्रधानांचे मतदारसंघ राहिले आहेत त्या राज्यामधून लोकं काम शोधायला बाहेर पडत असतील तर यासंदर्भात राज्यकर्त्यांनी विचार करायला हवा असंही राज म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं, स्थिर राहील; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला
उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला; ‘या’ दिवशी होणार विधान परिषद निवडणुका
संजय राऊत यांनी मानले केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार