Home महाराष्ट्र …मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?; विश्वजित कदम यांचा केंद्र सरकारला...

…मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?; विश्वजित कदम यांचा केंद्र सरकारला सवाल

परभणी : बिहार राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे केंद्र सरकार त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करतंय. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?,असा सवाल कृषी आणि न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारला केला आहे.

शासनाकडे पैसे नसताना आणि केंद्र सरकार जीएसटीचे पैसे देत नसताना सरकार 10 हजार कोटी रुपयांची मदत देत आहे. सदर मदत महिन्याभरात शासन शेतकऱ्यांना देईल, असंही विश्वजित कदम यांनी यावेळी म्हटलं आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचं परतीच्या पावसाने मोठं नुकसान झालं असून, शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याच्या सोबत आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार का दुर्लक्ष करते?,असा प्रश्नही विश्वजित कदम यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, राज्याचे कृषी व न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी कोरोना आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या बाबतीत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

Pub-G आजपासून पूर्णपणे बंद; मोबाईलमध्ये गेम चालणार नाही

अकरावी प्रवेश लवकरच; राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

“उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर कोंडी फुटली; राज्यात आजपासून कांदा लिलाव सुरु होणार