आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. अशातच शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता.
जेंव्हा जेंव्हा शिवसेना फुटली तेंव्हा तेंव्हा त्यामागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केला होता. यानंतर आता केसरकरांनी शरद पवारांची जाहीर माफी मागितली आहे. त्यानंतर त्यांनी आपण शरद पवारांना भेटायला जाणार आहोत, असंही केसरकर म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे ही वाचा : राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ खडसेंचं मोठं विधान, म्हणाले….
आपण आता थेट शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थान सिलव्हर ओक या ठिकाणी त्यांना भेटायला जाण्यास तयार आहोत, असं केसरकरांनी यावेळी म्हटलं. तसंच शरद पवार एक महान नेते आहेत, असंही केसरकर म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
औरंगाबादचं संभाजीनगर होणारच, नामांतराला स्थगिती नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट
राज ठाकरेंनी शिवसेना ‘सोडली’, पण…; राष्ट्रवादी नेत्याची टीका