मुंबई : भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केलं. सोशल मीडियावर या पुस्तकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर जयभगवान गोयल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
जर पक्षाने आदेश दिला तर मी पुस्तक मागे घ्यायला तयार आहे. पुस्तक बाजारात आलं आहे. पक्ष सांगेल त्याप्रमाणे करणार. अनेकजण राम, कृष्ण म्हणत लोकांची तुलना देवाशी करतात. मी काही चूकीचं काम केलेलं नाही. ही माझी भावना आहे, असं स्पष्टीकरण गोयल यांनी दिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जसं काम करायचे अगदी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत म्हणून मी त्यांचा उल्लेख महाराजांच्या नावाने केला. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं गोयल यांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील माता-बहिणींची चिंता करायचे तसंच मोदी देशातील माता-बहिणींच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. आज प्रत्येक महिलेला आपण सक्षम असल्याचं वाटतं. मोदींच्या नेतृत्त्वात भारताचा सन्मान वाढला आहे, असंही गोयल यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
‘हे’ पुस्तक थांबवण्यात यावं; शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी
“देशातील मावळा ‘हे’ कधीही सहन करणार नाही”
‘हे’ लक्षात ठेवा, नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे; जयंत पाटील यांचा भाजपला इशारा
तुम्हाला हे मान्य आहे का? शिवरायांचया वंशजांनो काहीतरी बोला; संजय राऊत आक्रमक