आंध्र प्रदेशमध्ये एका दलित विद्यार्थिनीच्या हत्येचं प्रकरण चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी सोशल मिडियावरून केली जात आहे. यावर एका तमिळ अभिनेत्रीने प्रतिक्रिया देताना धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तेलगु अभिनेत्री रेखा बोजने यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.
रेखाने तिच्या पोस्टमध्ये रडणाऱ्या मुलीचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसंच या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. संबंधित प्रकरणातील आरोपीची हत्या करण्यात यावी, असं रेखानं म्हटलं आहे. तसेच तिची हत्या करणाऱ्या व्यक्तीसोबत मी झोपेन असंही रेखाने म्हटलं आहे.
दरम्यान, रेखाने ही पोस्ट तेलगूमध्ये लिहिली असून भाषांतरामध्ये तिनं I Will Sleep With The One Who Cut Him असं रेखाने म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गाडीवर दगडफे
राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
आता उद्धवचा काळ संपला, महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार- नारायण राणे