…म्हणून मी दिल्लीत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस

0
421

मुंबई : मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असं म्हणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. मुंबईत परळ येथे  शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.

जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार येत नाही तोपर्यंत जाणार नाही. सध्याचे सरकार  हे राजकीय हाराकिरी करून आलेले सरकार आहे. आपलं सरकार बहुमतानं आलेलं होतं.  उद्या भविष्यात मोठं यश मिळल्याशिवाय राहणार नाही, असा दावा फडवणीस यांनी केला.

तीन चाकी रिक्षा प्रमाणे हे सरकार आहे. रिक्षाची चाके एकाच दिशेने जातात. मात्र, याची चाके तिन्ही बाजुला विरुद्ध दिशेने जात आहेत. हे फार काळ टिकणारे सरकार नाही. असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी-

आपल्यातील भांडण विसरा आणि बाळासाहेबांचं खरं स्वप्नं जामिनीवर येऊन पूर्ण करा- अमृता ठाकरे

जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी- रुपाली चाकणकर

देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्राला फायदाच- एकनाथ खडसे

काहीच न मिळाल्याने चित्रा वाघ यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे- रुपाली चाकणकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here