नांदेड : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून वातावरण चांगलंच तापलं आहे. नांदेड येथे मराठा क्रांती मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. या आंदोलनास भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित होते. यावेळी बोलताना संभाजीराजेंनी मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.
संसदेत घटना दुरुस्तीवर बोलण्यासाठी मी परवानगी मागितली होती. पण मला परवानगी नाकारण्यात आली. महाराष्ट्रातील आपल्या खासदारांमुळे मला बोलायला संधी देण्यात आली. मात्र, ही संधी देण्यात आली नसती तर त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो, असा गाैफ्यस्फोट संभाजीराजेंनी यावेळी केला.
आपल्याकडे समाजाची ताकद आहे. शिव-शाहूंचा वारसा आहे. हा वारसा गप्प बसणार का? शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला धुडाकवून लावलं होतं. त्यामुळे त्याच दिवशी मी ठरवलं होतं. त्या दिवशी बोलायला दिलं नसतं तर अरे कुठली खासदारकी सोडून टाकली, असं म्हणून मी बाहेर पडणार होतो., असं संभाजीराजे म्हणाले.
दरम्यान, नंतर मला बोलायला संधी दिली. तेंव्हा माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी सरकारला सवाल केला. ज्या शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यांच्या पणतूला तुम्ही दोन मिनिटं बोलायला देत नसेल तर उपयोग काय माझा अशी सुरुवात मी केली, असं म्हणत महाराष्ट्रातील खासदारांनी मला बोलता यावं म्हणून मदत केली. त्यांचे मी आभार मानतो, असं संभाजीराजेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजप नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक व शाईफेक”
“राष्ट्रवादीचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण”
राणे म्हणतात, आता उद्धव काळ संपला; संजय राऊत म्हणाले…
“शिवसैनिकांची कृती म्हणजे बुरसटलेली तालिबानी मानसिकता”