Home पुणे राष्ट्रवादीचे ‘हे’ मंत्री म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांच्या ऋणात राहू इच्छितो!

राष्ट्रवादीचे ‘हे’ मंत्री म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांच्या ऋणात राहू इच्छितो!

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : 2009, 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मोठी मदत केली, त्यामुळे मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केलं. अजित देविदास ढवळे-पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी इंदापूर सरस्वतीनगर येथे शिल्प व स्वागत कमान लोकार्पण सोहळा, हृदयरोग, आरोग्य शिबिराचे उदघाटन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक; काँग्रेस-शिवसेनेला दिला मोठा धक्का

2009, 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी मी प्रचारासाठी मोठी पायपीट केली. पण 2019च्या निवडणुकीत माला तेवढं प्रचाराला जावं लागलं नाही. खूप कमी फिरलो. कोणत्याही वाड्या-वस्त्यांवर मला मत द्या म्हणून सांगण्याची गरज भासली नाही. 2014 ते 2019 मध्ये इंदापूर तालुक्यातील वाडीवस्तीवर गेलो. प्रत्येकांच्या सुख-दु:खात सहभागी झालो. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे  मला मदत करत असतात. त्या काळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मला मोठी मदत केली, त्यामुळे मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, असं दत्तात्रेय भरणे म्हणाले आहेत.

दरम्यान, मागील वीस वर्षांपूर्वी इंदापूरचा विकास व आता माझ्या कारकिर्दीत होणारा विकास बघा. इंदापूर शहराच्या विकासासाठी कोणतेही राजकारण मध्ये न आणता ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. काही मंडळी येतात, त्यांचा या विकासकामांशी काहीही संबंध नसताना सभागृहाचे उदघाटन करतात. ज्या योजनेतून ते मंजूर झाले आहे, त्या योजनेचा आमदार म्हणून मी सदस्य आहे. लोकांनी तुम्हाला घरचा रस्ता दाखवला आहे, शांत बसण्यासाठी खूप वेळ दिला आहे. मात्र, त्यांना ते कळत नाही, असंही दत्तात्रेय भरणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत निम्मे डाॅक्टर, त्यांचं डोकं तपासावं लागेल; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

भाजपचा ‘हा’ मोठा नेता तृणमूल काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?; लवकरच ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता”

महाधिक्त्याशी बोलेन, पण तुम्ही संप मागे घ्या; अनिल परब यांचं एसटी कामगारांना आवाहन