आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : शहरातील विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हजेरी लावली होती. मात्र बैठकीवर बहिष्कार टाकत बाहेर पडण्याचा निर्णय रवींद्र धंगेकर यांनी घेतला.
या निर्णयानंतर धंगेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत प्रतिक्रिया दिली.
बैठक सुरू झाल्यावर पालकमंत्र्यांनी माझ्याकडं पाहिलंच नाही. बैठकीत पुण्यातील रस्ते आणि वाहतुकीबद्दल चर्चा सुरू होती. तेंव्हा अचानक गणेश बिडकर तिथं आले. आजच्या बैठकीला त्यांना निमंत्रण नव्हतं. मात्र, त्यांना भाजपचीच बैठक घ्यायची होती, नागरिकांमध्ये खुलेआम चर्चा करायला हवी होती., असा खुलासा धंगेकरांनी यावेळी केला.
हे ही वाचा : “मोठी बातमी; माजी मंत्री छगन भुजबळांची तब्येत बिघडली, वाटेतच हाॅस्पिटलमध्ये केलं दाखल”
दरम्यान, या बैठकीसाठी 6 जण निमंत्रित होतो. ही चर्चा सूरू असतानाच मध्ये बीडकर यांनी बोलण्यास सुरूवात केली. पालकमंत्र्यांना काही समजत नाही, त्यांनाच पुण्याचं समजतं, अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. पालकमंत्र्यांपेक्षा तज्ञ मंडळी आहेत. त्यामुळे आपण निघून आलेल महत्वाचं आहे, अशी नाराजी रवींद्र धंगेकरांनी यावेळी व्यक्त केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
माजी क्रिकेटर केदार जाधवचे वडील पुण्यातून गायब; मोबाईलही बंद असल्यानं केदार टेन्शनमध्ये
पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधील तरुणाने घातली राज ठाकरेंना साद, म्हणाला… तर हिंदूंचे भविष्य वाचेल