Home देश …म्हणून मी वाचलो; कुटुंबासोबत पहलगाममध्ये गेलेल्या प्राध्यापकाने सांगितला थरारक अनुभव

…म्हणून मी वाचलो; कुटुंबासोबत पहलगाममध्ये गेलेल्या प्राध्यापकाने सांगितला थरारक अनुभव

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेत आसाममधील एक कुटुंब थोडक्यात बचावलं आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या देबाशीष भट्टाचार्य यांनी आपला भयावह अनुभव सांगितला आहे. केवळ कलमा वाचल्यामुळे आपण वाचलो, असे त्यांनी म्हटले आहे.

ते आणि त्यांची पत्नी आसाम विश्वविदालयाच्या बंगाली भाषेच्या विभागात कार्यरत आहेत. ते त्यांची पत्नी आणि मुलासोबत काश्मीरला गेले होते, त्याचवेळी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही देखील तिथेच होतो. हा हल्ला झाला तेव्हा आम्ही एका झाडाच्या अडोशाला लपलो होते. तेव्हा मला तिकडे दिसलं की काही लोक कलमाचं पठण करत आहेत, तेव्हा मी देखील त्या लोकांमध्ये सहभागी झालो.

दरम्यान, त्यावेळी एक दहशतवादी माझ्यासमोर आला आणि त्याने मला विचारलं इथे तू काय करतोय, तू काय म्हणत आहेस? रामाचं नाव घेत आहेस का? त्यावेळी मी जोर जोराने कलमा म्हणून लागलो. खरं पाहाता मला पूर्ण कलमा येत नव्हता. मात्र त्या दहशतवाद्याने माझ्याकडे फार काही लक्ष दिलं नाही आणि माझा जीव वाचला. मी दाढी देखील वाढवली होती, आणि कलमाचे देखील पठण केले त्यामुळे माझा जीव वाचला, तो दहशतवादी माझ्यापासून दूर गेला , असं देबाशीष यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

गोपाळकृष्ण शाळेचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न 

गोपाळकृष्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी उभारली संकल्पांची गुढी

जिल्हास्तरीय नृत्याविष्कार स्पर्धेला शाळांचा उस्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांकडून अप्रतिम सादरीकरण

MVM सेमी इंग्लिश शाळेत बोरन्हाण संपन्न, काळे कपडे घालून विद्यार्थ्यांचा उत्साह