आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. यानंतर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, बीड जिल्ह्यातील विकास कामांबाबत चर्चा झाली, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं आहे.
हे ही वाचा : संजय राऊतांना हिंदुत्व कळलेले नाही, यासाठी…; नारायण राणेंची टीका
माझ्या जिल्ह्यातील विकास कामांसाठी गडकरी साहेबांना भेटले. खासदार प्रीतम मुंडे आमच्या जिल्ह्यातील आमदार माधुरी मिसाळ या सोबत होत्या. विकासकामांचा विषय होता, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, पंकजा मुंडेंनी यावेळी नितीन गडकरींचे आभार देखील मानले आहेत. नितीन गडकरी यांनी आमच्या विकासकामांना भरभरून दिलं आहे. जे काही छोटे विषय आहेत आणि प्रलंबित विषय आहेत ते त्यांनी लगेच तात्काळ जागच्या जागी मार्गी लावले, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचं मंत्रिपद जातंय ते पाहुया; रामदास आठवलेंचा टोला
“अजित पवारांनी सांगितलेल्या सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी व्हावी”
वसईत शिवसेनेला मोठे खिंडार; 150 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे